Thursday, May 5, 2011

गरज..!!!

तुझ्या भावना जाणायला
मला शब्दांची गरज नव्हती मला कधीच.!
तुझे दुखः जाणवायला
तू अश्रू ढालण्याची गरज नव्हती मला कधीच .!
तुये हास्य जाणवायला
विनोदाची गरज नव्हती मला कधीच.!
तुझा विरह सहन करायला
फार अंतरावर जाण्याची गरज नव्हती मला कधीच.!
कालांतराने लक्षात आले
आपल्या नात्याची गरज नव्हती तुला कधीच.!
होतो मी तुझा
पण स्वतःचा समजण्याची गरज नव्हती तुला कधीच..!

Monday, October 5, 2009

माझी पुस्तके ......

हल्ली माझी पुस्तके माझी वाट पहात असतात ..
कप्पा उघडला की "मला घे ..मला घे " म्हणतात ..
नेहमीप्रमाणे मी निवडक पुस्तक उचलते ..
मग उगाच साहित्य अणि अभ्यासाची पुस्तक ..
यांच्यात गट पडतात न् सुरु होते गटबाजी
मग अभ्यासाची पुस्तके दू:खी होतात, .....
उदास भासतात पण निराश मात्र होत नाहीत ..
कारण त्यांना आहे हा विश्वास ,स्वत: च्या महत्वावर
ही आपल्याला उचल्नारच.. कारण आहे शेवटी ही परिक्षार्थीच
आज नहीं तर उद्या..परीक्षा जवळ आली की..
मग हिला येणार आपलीच आठवण ..
मग हिचा दिवस आपल्याशिवाय न सुरु होणार ..
तोपर्यंत हिला "स्पेस " द्यावी असा विचार करून..
माझी पुस्तके पुन्हा माझी वाट पहात असतात ..

Monday, September 21, 2009

अर्थ

भरारी न घेणार्या
पंखाला अर्थ तो काय ?
समाजाचा उद्धार न करू शकणार्या
शिक्षणाला अर्थ तो काय?
सुख-समाधान न देणार्या
पैश्याला अर्थ तो काय?
पान्थाला मार्ग ना दाखवणार्या
पथदिव्याला अर्थ तो काय?
संतोषाकडे न नेणार्या
इच्छापूर्तिला अर्थ तो काय?
वारंवार चूका करणार्या
माणसाच्या चुकांना अर्थ तो काय?
धेय्याकडे न बघणार्या
ध्येयवानाच्या कर्तुत्वाला अर्थ तो काय?
वाचकांचा विचार ना करणार्या
कवीच्या काव्याला अर्थ तो काय?
(म्हणुन ही भारी कविता आत्ता थांबवते )

सहज वाटले....म्हणुन

सहज वाटले रडावे
म्हणुन रडायचे नसते ..//
सहज वाटले हसावे
म्हणुन हसायचे नसते..//
सहज वाटले प्रेम करावे
म्हणुन प्रेम करायचे नसते ..//
सहज वाटले नाते तोडायचे
म्हणुन नाते तोडायचे नसते ..//
सहज वाटले एकटे रहावे
म्हणुन लोकांना दूर करायचे नसते ..//
सहज वाटले लोकांना छलावे
म्हणुन काव्य करायचे नसते..//
सहज वाटले कविता लिहावे
म्हणुन लिहून तिला blog वर टाकायचे नसते ..//

Wednesday, July 22, 2009

आयुष्याच्या वाटेवर....!!

आयुष्याच्या वाटेवर ...
आयुष्याच्या वाटेवर चालताना
भेटले काही दगड
काही होते मार्गदर्शक
तर काही होते ठेचालणारे ..!!

आयुष्याच्या वाटेवर चालताना
भेटले काही साथी
काही होते हितचिन्तक
तर काही हितशत्रु न दिसणारे ..!!

आयुष्याच्या वाटेवर चालताना
भेटले काही पथ-दिवे
काही होते पथदर्शक
तर काही मार्ग अंधुक करणारे ..!!

आयुष्याच्या वाटेवर चालताना
भेटले काही वाहन
काही होते ध्येयाकडे नेणारे
तर काही ध्येयापासून दुरावणारे ..!!

आयुष्याच्या वाटेवर चालताना
भेटले काही नविन रस्ते
काही होते मार्ग पर्यायी
तर काही आवश्यक असणारे ..!!

आयुष्याच्या वाटेवर चालताना
भेटले एक नवे वळण
वळणावर साध्य झाले माझे ध्येय
अन् सापडले नवे ध्येय दूर वर दिसणारे ..!!

Sunday, May 24, 2009

श्वेत

श्वेत आहे मन अजुनी ..

श्वेत आहे मन अजुनी ..
भगवे माझे संस्कार ..
हिरव्या रम्य माझ्या कल्पना ..
नीले अफाट माझे विचार ..
गुलाबी सुप्त माझ्या भावना..
लाल गडद मज़ा त्वेष ..
तरीही सर्व रंगत रंगनार्य माझे ..
श्वेत आहे मन अजुनी..!!

मी कोण..???

मी कोण..???
एक थेंब जीवनाचा ..
एक श्वास जीवनाचा ..
एक विश्वास स्वप्नापुर्तिचा ..
एक स्पर्श विश्वासाचा ..
एक हव्यास यशाचा..
एक प्रयास स्वातंत्र्याचा ..
एक स्पंदन हृदयाचा ..
एक आभास चैतन्याचा..
एक तारा नभातला..
होय तोच मी.....
/* Marathi Blogs